काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली आहे. त्यातच आता या चित्रपटाच्या नावावर एक नवा विक्रम होणार असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाची चक्क पाच भाष्यांमध्ये निर्मिती होणार आहे. अभिनेता,दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

‘चोरीचा मामला’ या चित्रपटाची लवकरच मल्याळम, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे पाच भाषांमध्ये निर्मिती होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..


‘चोरीचा मामला’ या चित्रपटात एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची संकल्पनाच मजेशीर आहे, त्यात प्रासंगिक विनोद, खुमासदार संवादांचा तडका या कथानकाला मिळाला आहे. त्याशिवाय ताल धरायला लावणारं संगीत हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

दरम्यान, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमाळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन जाधवने या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.