शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच एक नाव आहे. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा उल्लेख येतो तिथे तिथे तानाजी मालुसरे हे नाव आपसुकच घेतलं जातं. आजवर कधी खलनायकी तर कधी सद्गृहस्थाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता गणेश यादव ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात तानाजी मालुसरेंच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सुभेदार तानाजी मालुसरे’ हे नाव घेताच डोक्यावर पगडी, रुंद चेहरा, भारदास्त मिशा, हाती ढाल-तलवार घेतलेली निधड्या छातीची व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर उभी राहते. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने जेव्हा ‘फर्जंद’ या सिनेमाची पटकथा लिहिली तेव्हा त्याच्या नजरेसमोर असंच काहीसं वर्णन असलेला कलाकार उभा राहिला तो म्हणजे गणेश यादव. ‘फर्जंद’च्या माध्यमातून लेखनाकडून सिनेदिग्दर्शनाकडे वळताना दिग्पालने आजवर कधीही समोर न आलेला इतिहास जगासमोर मांडण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie farjand tanaji malusare role will played by ganesh yadav
First published on: 24-04-2018 at 17:43 IST