एखादा चित्रपट देश-विदेशांमधील चित्रपट महोत्सवांमध्ये गाजला की, आपोआप सर्वांचे त्या चित्रपटाकडे लक्ष वेधलं जातं. मागील काही दिवसांपासून ‘कानभट’ हा आगामी मराठी चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या समजल्या जाणाऱ्या सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवतांना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच विविध पुरस्कार आपल्या नावे केली आहेत. या चित्रपटने एका मागोमाग एक असे आजवर एकूण १५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारांवर आपल्या नावाचा ठसा उमटवण्यात यश मिळवले आहे.

विविध सिने महोत्सवांमध्ये अभिनयापासून सादरीकरणापर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने न्याहाळत मूल्यमापन करणाऱ्या देश-विदेशातील परिक्षकांनी ‘कानभट’च्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यामुळे भव्य शिंदे आणि ऋग्वेद मुळे यांची मुख्य भूमिका असलेला ‘कानभट’ विदेशातही चर्चिला जात आहे.

stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
Lower voter turnout in Maharashtra than national average What is the national average voter turnout
राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान, मतदानाची राष्ट्रीय सरासरी किती?

‘कानभट’ला मिळालेले विविध पुरस्कार

सिनेमाने आजवर साऊथ फिल्म अँड आर्टस अॅकॅडमी चिले (सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शिका), छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), लॅकेसिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शिका), अयोध्या फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), व्हाईट युनिकॅार्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), न्यू जर्सी इंडियन अँड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), दृक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), आठवा नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), व्हर्जिन स्प्रिंग्ज सिनेफेस्ट (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), अॅकोलेड ग्लोबल फिल्म कॅाम्पिटीशन (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट) आणि पोर्टब्लेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट) या सिनेमहोत्सवांमध्ये विविध पुरस्कार जिंकले आहेत.

दरम्यान, ‘कानभट’ हा पीरियड ड्रामा असून तो १९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात भाव्य शिंदे, ऋग्वेद मुळे, संजीव तांडेल, विपीन बोरटे,मनिषा जोशी, अनिल चित्रे, ही कलाकार मंडळी झळकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अपर्णा होसिंग यांनी केलं असून निर्मितीदेखील त्यांनीच केली आहे.