सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वात विविध धाटणीचे आणि नवनवीन कथानक असलेले विषय हाताळले जात आहेत. यामध्येच आता आणखी एका नव्या विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. ‘कानभट’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असून अलिकडेच त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लहान मुलाच्या स्वप्नांवर आणि त्याच्या इच्छा-आकांक्षांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रभात या चिमुकल्याची मुंज होते आणि त्याला शास्त्रोक्त पद्धतीने वेदांचा अभ्यास करण्यासाठी वेद शाळेत पाठवलं जातं. मनात नसतानादेखील केवळ वडिलांच्या धाकामुळे प्रभातला आईपासून दूर जावं लागतं. वेदशाळेत गेल्यावर प्रभातच्या चंचल स्वभावामुळे बऱ्याचदा त्याला गुरुजींकडून ओरडा खावा लागतो. विशेष म्हणजे याच प्रवासात त्याच्यातील एक नवीन गुण त्याला सापडतो, असं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. कानभट्ट या चित्रपटात वेद आणि विज्ञान यांच्यातील परस्पर संबंध दर्शविण्यात आला आहे.

Amazon Gudi Padwa Sale 2024 going to offer deals and more on online shopping sites Read Everything About Offers
गुढीपाडव्यानिमित्त ॲमेझॉनचा बंपर सेल सुरू; साडी, दागिने अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट, तुम्ही कधी करताय खरेदी?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Pavan Davuluri IIT Madras graduate is new head Or Boss of Microsoft Windows and Surface
आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट विंडोजचे ठरले नवे बॉस; जाणून घ्या पवन दावुलुरीबद्दल


“दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी मी खास मराठी चित्रपटाचीच निवड केली. कारण आता आशयघन आणि अभिनय यामुळे मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे. माझं कायम कथानकाला आणि चित्रपटाच्या विषयाला प्राधान्य देण्यावर भर आहे. मी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे”, असं दिग्दर्शिका अपर्णा होसिंग म्हणाला.

दरम्यान, ‘कानभट’ हा पीरियड ड्रामा असून तो १९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात भाव्य शिंदे, ऋग्वेद मुळे, संजीव तांडेल, विपीन बोरटे,मनिषा जोशी, अनिल चित्रे, ही कलाकार मंडळी झळकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अपर्णा होसिंग यांनी केलं असून निर्मितीदेखील त्यांनीच केली आहे.