सध्या संपूर्ण जग हे इंटरनेटमुळे एकत्र आल्या कारणाने या लॉकडाउनमध्येही सर्वांना घरबसल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती, आणि याच संधीचा फायदा घेत आगामी विविध मराठी सिनेमांच्या घोषणा होत गेल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’चे टिझर पोस्टर आणि मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नेटकऱ्यांच्या उदंड प्रतिसादानंतर आता निर्माता आणि अभिनेता जे. उदय त्यांचा ‘लॉ ऑफ लव्ह’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित करणार असल्याची घोषणा सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वरून करण्यात आली आहे. पोस्टरवर झळकणारे दोन नवे चेहरे या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहेत.

लॉ ऑफ लव्ह हे नाव जसं हटके आहे अगदी तशीच त्याची कहाणी देखील हटके आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलावार कायद्यारुपी गळ टाकल्यावर त्यांच्यावर याचा काय परिणाम होतो हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जे. उदय आणि शाल्वी शाह यांची नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर, अभिनेते अनिल नगरकर आणि अभिनेत्री प्राची पालवे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा, पटकथा आणि निमिर्ती जे. उदय यांचीच आहे. सिनेमातील संवाद जे उदय आणि मकरंद लिंगनूरकर यांनी लिहिले आहेत.

pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
vidya balan express adda
Video: विद्या बालन व प्रतीक गांधी यांची ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या निमित्तानं खास मुलाखत, पाहा LIVE
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब

मुंबई, कुडाळ आणि कोल्हापूरच्या नयनरम्य ठिकाणी चित्रित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांना अनोखा अनुभव देईल. मनोरंजनात तसेच जगण्यातील तोच तोचपणा बाजूला सारत मस्त रिफ्रेश करणारा वेदिका फिल्म्स क्रिएशन निर्मित ‘लॉ ओफ लव्ह’ ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.