03 December 2020

News Flash

‘मुळशीचा पॅटर्न’चा दरारा पुन्हा एकदा; चित्रपटगृहांमध्ये घुमणार ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘चा आवाज

मुळशी पॅटर्न लवकरच चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हा आवाज कानावर पडला की सगळ्यांचं लक्ष अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याकडे वेधलं जातं.  ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रवीण तरडे यांनी एक नवा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यातच आता लॉकडाउनच्या प्रदीर्घ काळानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून लॉकडाउन करण्यात आला. या काळात थिएटर, मल्टिप्लेक्स सारं काही बंद होते.मात्र, आता अनलॉकच्या टप्प्यात चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर संवेदनशील भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्थान मिळविले आहे. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर खतरनाक कामगिरी करत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

काल्पनिक कथेवर आधारित, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटातील ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच ५३ मिलियन व्हूजचा टप्पा पार केला. आता पुन्हा एकदा ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे, हा चित्रपट पुणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, अकलूज या शहरात प्रदर्शित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 10:20 am

Web Title: marathi movie mulshi pattern movie cinema hall ssj 93
Next Stories
1 करण जोहरने चित्रपटाच्या नावाची केली कॉपी; मधुर भांडारकरांचा आरोप
2 “माझ्याकडे सलमानचा नंबर नाही”; बेरोजगार अभिनेता मागतोय काम
3 करोना काळात BTS ने दिला खास संदेश; ‘लाइफ गोज ऑन’गाणं प्रदर्शित
Just Now!
X