News Flash

पाहा: स्वप्नील आणि मुक्ताच्या ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ चे नवीन पोस्टर

मराठी चित्रपटांच्या दुनियेत सर्वात लोकप्रिय ठरलेली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

| May 16, 2015 10:59 am

मराठी चित्रपटांच्या दुनियेत सर्वात लोकप्रिय ठरलेली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलनिमित्त ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पडद्यावर पाहता येणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता आणि त्यानंतर स्वप्नील आणि मुक्ताची जोडीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सध्या सोशल मिडीयावर या चित्रपटाचे पोस्टर फिरत असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘लग्नाला यायचं हं…’ या नव्या टॅगलाईनसह हा चित्रपट नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. मराठीतील हा सिक्वेल १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Poster

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2015 10:59 am

Web Title: marathi movie mumbai pune mumbai 2
Next Stories
1 सनी लिओनीविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल
2 रणवीर सिंग, शार्क मासा आणि ‘पेटा’!
3 एका चित्रपटासाठी अकरा निर्माते!
Just Now!
X