21 September 2020

News Flash

Video : ‘नशीबवान’मधील ‘ब्लडी फुल…’ गाणं प्रदर्शित

नशीबवान हा चित्रपट 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारित आहे.

सुप्रसिद्ध मराठी कलाकार भाऊ कदम यांचा आगामी ‘नशीबवान’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये भाऊ कदम प्रमुख भूमिकेत झळकणार असून यात तो वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतच या चित्रपटातील ‘ब्लडी फुल जिया रे’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘ब्लडी फुल जिया रे’ हे उडत्या चालीचं असणार गाणं आनंद शिंदे यांनी स्वरबद्ध केले असून सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीत दिले तर शिवकुमार ढाले यांनी हे गाणं लिहिले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

गाणं दिसताना जितके रंजक, ऐकताना जितके मजेदार वाटत आहे तितकीच मेहनत गाणं चित्रित करताना झाली. कारण या गाण्याचे चित्रीकरण हे एका खऱ्याखुऱ्या डान्स बार मध्ये करण्यात आले, आणि हा डान्स बार फक्त चोवीस तासासाठीच उपलब्ध होणार होता. या चोवीस तासात एवढ्या भव्य गाण्याचे चित्रीकरण करणे हे नशीबवानच्या टीम समोर खरंच मोठे आव्हान होते, परंतु हे आव्हान या टीमने स्वीकारले आणि ते अगदी लीलया पेलले सुद्धा.
अवघ्या एका दिवसात या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण चांगल्या पद्धतीने पार पडलं. मुख्य म्हणजे ज्या डान्स बार मध्ये हे चित्रीकरण सुरु होते त्या डान्स बारच्या बाहेर कोणालाही कल्पना नव्हती कि इथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. या सर्व मेहनतीची पोच पावती म्हणजे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच या गाण्यामध्ये आनंद शिंदे याची एक खास झलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारित असलेला ‘नशीबवान’ हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या चित्रपटाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:52 pm

Web Title: marathi movie nashibvaan song bloody fool jiya re release
Next Stories
1 ‘नेटफ्लिक्स’च्या ‘जंगल बुक’मध्ये बॉलिवूडचे ‘राम-लखन’ आणि ‘धकधक गर्ल’
2 आयुष्य समृध्द करणाऱ्या एका “सायकल” चा प्रवास
3 Photo : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार
Just Now!
X