News Flash

अनोख्या मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’

मित्रांसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या मित्रांना चित्रपटांमध्ये पाहिले आहे

आतापर्यंत आपण जिवलग मित्रासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या मित्रांना चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलू आहेत. मैत्रीचे पैलू उलगडून दाखवताना त्याचे वेगळे रूप दर्शवणारा ‘ओढ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली एण्टरटेनमेन्ट हाऊसची प्रस्तुती तसेच एस.आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’चे दिग्दर्शन नागेश दरक आणि एस.आर. तोवर यांनी केले आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.

गणेश आणि दिव्या यांच्यातील निखळ मैत्रीची कथा ‘ओढ’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या दोघांच्या मैत्रीचं भावविश्व त्यातली त्यांची ओढाताण दाखवताना एका घटनेनंतर गणेश व दिव्याची मैत्री कोणतं वळण घेते? याची रंजक कथा म्हणजे ‘ओढ’ हा चित्रपट. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी या कलाकारांसोबत गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मालिकेत राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी उल्का ‘ओढ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटांकडे वळली आहे.

संजाली रोडे, कौतुक शिरोडकर, अभय इनामदार, कुकू प्रभास यांनी यातील चार वेगवेगळ्या जॅानरची गाणी लिहिली आहेत. आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ही गाणी गायली आहेत. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केले आहे. या चित्रपटाचे छायांकन रविकांत रेड्डी व संकलन समीर शेख यांनी केले आहे. वेशभूषा सुनिता घोरावत तर रंगभूषा प्रदीप दादा, बंधु धुळप यांची आहे. कलादिग्दर्शक आरिफ खान आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 9:56 pm

Web Title: marathi movie odh mohan joshi bhau kadam bharat ganeshpure
Next Stories
1 ….जेव्हा विरेंद्र सेहवागने साक्षी तन्वरसाठी बनवला चहा
2 जाणून घ्या, कोणकोणत्या राज्यात ‘पद्मावत’ला ‘नो एण्ट्री’
3 करणी सेनेची दहशत अद्यापही कायम, कलाकार नाही करणार ‘पद्मावत’चे प्रमोशन?
Just Now!
X