News Flash

स्वराज्याच्या पर्वाची चाहूल ‘जिऊ’; लवकरच रुपेरी पडद्यावर

नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’ इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ यांचा आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या.

प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या आयुष्यावर आधारित एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘जिऊ’ असे आहे. फायरफ्लाईज एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत ‘जिऊ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रितम एस.के. पाटील करत आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

अनुजा देशपांडे यांचा ‘जिऊ’ हा पहिलाच चित्रपट असून ह्या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत ‘जिऊ’ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. तर ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर तिसरा ‘जिऊ’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक प्रितम एस.के.पाटील उत्सुक आहेत.
अनुजा देशपांडे सांगतात, “महिलांच्या हाती केवळ पाळण्याचीच नाही तर संपूर्ण राज्याच्या जडणघडणीची दोर देखील सक्षमपणे सांभाळण्याची ताकद आहे. स्वराज्य पर्वाची चाहूल देणारी ही आई आपल्या लेकींना सांगू पाहतेय उठा.. सज्ज व्हा.. स्वालंबी व्हा…प्रगतीची नवी दालनं शोधा.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 6:25 pm

Web Title: marathi movie on chhatrapati shivaji maharajs mother rajmata jijabai mppg 94
Next Stories
1 भुतांमागचे हात
2 सुशांत सिंग रजपूतची नवी गर्लफ्रेंड? फोटो झाला व्हायरल
3 Video : हसवून हसवून बेजार करणारा ‘चोरीचा मामला’
Just Now!
X