04 August 2020

News Flash

‘गझल’ रुपेरी पडद्यावर!

मराठी चित्रपटात गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे विषय आणि प्रयोग होत असून रसिक प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे

मराठी चित्रपटात गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे विषय आणि प्रयोग होत असून रसिक प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अलीकडेच चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन ‘कविता’ हा विषय घेऊन चार वेगवेगळे लघुचित्रपट तयार केले होते. तीन कविता आणि एक शेर यावर आधारित चित्रपटाचा हा प्रयोग वेगळा ठरला होता. आता ‘गझल’ या काव्यप्रकारावर आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
निर्माते मोहन जाधव व कमल जाधव यांची निर्मिती असलेल्या ‘गझल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन निनाद शिंदे करत आहेत. पदार्पणाच्या पहिल्याच प्रयत्नात वेगळा प्रयोग म्हणून ‘गझल’ या काव्यप्रकारावरील चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे आव्हान शिंदे यांनी स्वीकारले आहे.
मराठी चित्रपटात यापूर्वी ‘गझल’ हा विषय हाताळला गेलेला नाही. त्यामुळे ‘गझल’चा प्रयोग आगळा ठरणार आहे. चित्रपटात दोन गझलांचा समावेश करण्यात आला असून संपूर्ण चित्रपटाचे कथानकच ‘गझल’वर आधारित आहे. प्रेमाचा नवा अर्थ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा निर्माते व दिग्दर्शकांनी केला आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा निनाद शिंदे यांचीच असून चित्रपटात दोन गझलांसह एकूण सात गाणी आहेत. त्यामुळे संगीत रसिक व श्रोत्यांसाठीही हा चित्रपट म्हणजे गाण्यांची पर्वणी ठरणार आहे.
चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गणपतीवरील ‘रूप सुंदर’ या गाण्याने करण्यात आला. सुजित यादव व तेजस बने यांनीच हे गीताचे लेखन केले असून संगीतही त्यांचेच आहे. गायक दिव्यकुमार यांच्या आवाजात हे गाणे ध्वनिमुद्रित करण्यात आले. संगीत संयोजन अमितराज यांचे होते. या वेळी चित्रपटाशी संबधित सर्व तंत्रज्ञ उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2015 7:49 am

Web Title: marathi movie on gazal
टॅग Marathi Movie
Next Stories
1 भारतात पाऊल ठेवायची माझी इच्छाही नाही- मिया खलिफा
2 ‘कोंबडी पळाली’नंतर आता ‘कोंबडा पळाला..’
3 भीमसेन देठे, प्रतिमा जोशी यांना ‘दया पवार स्मृती पुरस्कार’
Just Now!
X