News Flash

पद्मिनी कोल्हापुरेंनी ‘प्रवास’निमित्त जपली ही आवड!

या चित्रपटात त्यांच्यासोबत अशोक सराफ स्क्रीन शेअर करणार आहेत

पडद्यावर वेगवेगळे मुखवटे धारण करून रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या बऱ्याच कलावंताच्या अंगी अभिनयाखेरीजही अन्यही काही कलागुण असतात. त्यामुळे अनेक जण कामाच्या गराड्यातून वेळ काढत त्यांची आवड, छंद जोपासत असतात. परंतु अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या कामातूनच छंद जोपासल्याचं दिसून येत आहे.

बालकलाकार ते हिंदी चित्रपटांतील यशस्वी नायिका असा प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी पद्मिनी यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांची ही आवड शशांक उदापूरकर दिग्दर्शित आणि ओम छंगानी निर्मित ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटाने जोपासली आहे. पद्मिनी यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड होती. ‘प्रवास’मध्ये त्या चित्रकाराची भूमिका साकारत असून या भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी त्यांची आवड जोपासली.

“या चित्रपटाच्या निमित्ताने भरपूर चित्रं काढता आली. पुन्हा एकदा रंगांबरोबर खेळता आलं. चित्रीकरणादरम्यान मिळणाऱ्या मोकळ्या वेळात मी चित्रकलेची माझी हौस भागवू शकले”, असं पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितलं. बालकलाकाराच्या रूपात सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत पद्मिनी यांनी असंख्य लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यात दोन मराठी आणि एका मल्याळम चित्रपटांचाही समावेश आहे. याशिवाय एका इंग्रजी भाषिक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या पद्मिनी ‘प्रवास’ या मराठी चित्रपटांत पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत. या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची जोडी जमली आहे.

शशांक उदापूरकर यांनी जेव्हा पद्मिनी यांना ‘प्रवास’ची कथा ऐकवली, तेव्हा कथा ऐकताना अनाहूतपणे त्यांच्या डोळ्यात कधी पाणी तरळलं ते त्यांनाही समजलं नाही. पद्मिनी कोल्हापुरेंसारखी हुषार अभिनेत्री आणि त्यांच्या जोडीला अशोक सराफांसारखा मराठी सिनेसृष्टीतील अभिनयाचा सम्राट लाभल्यानं ‘प्रवास’ चित्रपटाचा ‘प्रवास’ खऱ्या अर्थाने सुखकर झाल्याचं शशांक उदापूरकर यांचं म्हणणं आहे. हा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 12:29 pm

Web Title: marathi movie parvaas padmini kolhapure hobbies to cultivate ssj 93
Next Stories
1 ‘तान्हाजी’ चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा हा मराठी अभिनेता कोण ?
2 Video : ”झुंड’ नहीं टीम कहिए..’; अमिताभ-नागराज मंजुळेंचा दमदार टीझर
3 ‘तान्हाजी’ची दहा दिवसांत बक्कळ कमाई; तिकिटबारीवर गर्दी
Just Now!
X