इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या स्वप्नांना मार्गी लावण्याचे काम प्रत्येकजण करत असतो. यात प्रत्येकाला यश अपयशाच्या पायऱ्या देखील चढायला लागतात. यश-अपयशाच्या समीकरणावर लढणारी लढाई ही नक्कीच उंच शिखरावर घेऊन जाते. असाच शिखर सातारा जिल्ह्यात येणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका नवोदित तरुणाने गाठला आहे. सिनेमा बनवण्याच्या वेडापायी त्याने चक्क आयफोनवर सिनेमा चित्रित केला आहे. दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन या चारही भूमिका जबाबदारीने पार पाडत दिगंबर वीरकर ‘पिच्चर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आयफोनवर चित्रित होणारा हा पहिलावहिला ‘पिच्चर’ सिनेमा आहे.

कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता चित्रित करण्यात आलेला या चित्रपटाची कथा अधिकच उत्सुकता वाढवणारी आहे. आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचे यावर थोडक्यात चित्रपटाची कथा वळण घेते. आयफोनवर चित्रित होऊन प्रदर्शित झालेला हा ‘पिच्चर’ चित्रपट गाण्यांशिवाय गावाकडील नजाखत उंचीवर नेत आहे. या चित्रपटात जगदीश चव्हाण, राम गायकवाड, महेश आंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर, महेश्वर पाटणकर, कुशल शिंदे, सीमा निकम, सीमा वर्तक, सोनाली विभुते, रविकिरण दीक्षित, अविनाश धुळेकर या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला केदार दिवेकर याने पार्श्वसंगीत दिले असून चित्रपटाचे साउंड डिझायनिंग निखिल लांजेकर याने केले आहे.

The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

दिग्दर्शक दिगंबर चित्रपटाबाबत असे म्हणाले की, “सिनेमा हे माध्यम माझ्यासाठी नवीनच आहे आणि हे असे माध्यम आहे जे आपल्यातल्या कलागुणांना जोपासण्याचे बळ देते. माझ्यातल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्यासाठी सिनेमा हे एक मोठे माध्यम मला मिळाले आहे. तसेच चित्रपटाच्या निर्मितीसाठी महेश्वर पाटणकर, सचिन गायकवाड, निलेश साळुंखे, मंगेश हाबडे, श्रीकांत निकम या माझ्या मित्रांचा खारीचा वाटा आहे. आयफोनवर चित्रित करत मी हा ‘पिच्चर’ सिनेमा दिग्दर्शित केला असून हा सिनेमा एमएक्स प्लेअरवर मोफत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.”