आजच्या तरुणाईला अॅक्शनपटांचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळेच सध्या मराठी चित्रपटसृष्टीतही अशाच चित्रपटांची निर्मिती होताना दिसते. असाच एक अॅक्शन सोबतच इमोशन आणि त्याच्या जोडीला ठसकेबाज संवादांनी भरलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रॉकी’ असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘सळसळतं रक्त आणि अंगात रग, वाटेला गेलात याच्या तर बाजार उठलाच म्हणून समजा’ असा इशारा देत’ रॉकी’ चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर पिळदार शरीरयष्टीचा एक तरुण दिसत असून हा तरुण नेमका आहे तरी कोण? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
दरम्यान, हे पोस्टर तरुणांमध्ये लोकप्रिय होत असून त्याचा टीझरही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम व्हिवर प्रोडक्शन्स आणि सेवेन सीज प्रोडक्शन्स यांची असून प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंट यांची आहे.मात्र या चित्रपटामधील कलाकारांच्या भूमिकेवरील पडदा अद्याप उचलण्यात आलेला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 2:06 pm