21 September 2018

News Flash

VIDEO : ती ‘शिकारी’ येतेय…

मराठी सिनेमात बोल्डनेसचा विषय हाताळण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा

शिकारी

विविध विषयांवर भाष्य करत साचेबद्ध कथानकांना शह देत मराठी सिनेमातही काही प्रशंसनीय प्रयोग करण्यात येत आहेत. याच प्रयोगांचं एक उदाहरण म्हणजे आगाम सिनेमा ‘शिकारी’. काही दिवसांपूर्वीच या सिनेमच्या पोस्टरने कलाविश्वात बऱ्याच चर्चांना वाचा फोडली. मराठी सिनेविश्वात बोल्ड विषय हाताळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, तरीही ‘शिकारी’चा पोस्टर मात्र या साऱ्यात त्याचं वेगळेपण जपण्यात यशस्वी ठरला. या पोस्टरमागोमागच सिनेमाच्या टीझरनेही अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे.

HOT DEALS
  • Sony Xperia XZs G8232 64 GB (Ice Blue)
    ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
    ₹3500 Cashback
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%

महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असणाऱ्या या सिनेमाचा टीझर पाहता आता त्याच्या कथानकाविषयी बरेच तर्क लावण्यात येत आहेत. विजू माने दिग्दर्शिक या चित्रपटातून विनोदी कथानक पाहायला मिळणार, हा चित्रपट अडल्ट कॉमेडी असणार की, एक गंभीर सामाजिक नाट्य असणार याबद्दलच मराठी चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

‘शिकारी’च्या निमित्ताने नेहा खान चित्रपटविश्वात पदार्पण करत असून, नेहाच्या अदांची एक झलक या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘भोर भये पनघट पे’ या गाण्याचा नवा अंदाजही ‘शिकारी’च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘आर्यन ग्लोबल एंटरन्टेन्मेट’ची निर्मिती असणाऱ्या ‘शिकारी’ या सिनेमातून आता आणखी कोणकोणत्या कलाकारांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

First Published on March 13, 2018 1:12 pm

Web Title: marathi movie shikari teaser watch video