10 December 2018

News Flash

६ जानेवारीला कळेल ‘ती सध्या काय करते’

या सिनेमाच्या टिझरमध्ये एक फ्रेश चेहरा दिसत आहे

सतीश राजवाडेचा आगामी सिनेमा 'ती सध्या काय करते'

लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात हे आपण नेहमीच ऐकतो. पण मग प्रेमाचं काय? ते कधी कोणावर होतं हे तर खुद्द देवही सांगू शकणार नाही. त्यातही पहिलं प्रेम तर विसरणं केवळ अशक्यच. आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुम्ही आम्ही प्रेमात पडतो. ते प्रेम यशस्वी होवो अथवा न होवो. त्या माणसाला आणि त्या आठवणींना विसरणं केवळ अशक्यच असतं. मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात त्या आठवणी आपण जपून ठेवलेल्या असतात. त्या आठवणी आयुष्यभर सोबत असतात. त्या आठवणी अचानक तोंडावर हासू आणतात आणि ते जुने दिवस आठवू लागतात. अहो हे आम्ही नाही तर सतीश राजवाडेचा आगामी सिनेमा ‘ती सध्या काय करते’मध्ये म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी सतीश राजवाडेचा आगामी सिनेमा ‘ती सध्या काय करते’चा टिझर प्रदर्शित झाला होता. झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा आता ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांना एक वेगळे कथानक असलेला सिनेमा लवकरच पाहायला मिळणार आहे.

img-20161207-wa00141

 

या सिनेमाच्या टिझरमध्ये एक फ्रेश चेहरा दिसत आहे. अभिनय बेर्डे या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा आपल्या आई- वडिलांचा वारसा पुढे न्यायला सज्ज झाला आहे. या सिनेमात तो अंकुश चौधरीची किशोरवयीन भूमिका साकारत आहे. तर आर्या आंबेकर ही तेजश्री प्रधानची किशोरवयीन भूमिका साकारताना दिसत आहे.

तेजश्री प्रधान ही ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तसेच तिने ‘शर्यत’, ‘झेंडा’, ‘लग्न पाहावे करून’ असे अनेक सिनेमेदेखील केले आहेत. ती सध्या अभिनेता शर्मन जोशीसोबत ‘मैं और तुम’ हे हिंदी नाटक करत आहे. तर अंकुश चौधरी याने मराठी सिनेसृष्टीला ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट’, ‘दुनियादारी’, ‘गुरू’, ‘डबलसीट’, ‘शहाणपण देगा देवा’ असे एक से एक सुपरहीट सिनेमे दिले आहेत.’

First Published on December 7, 2016 12:51 pm

Web Title: marathi movie ti sadhya kay karte will release on 6th january 2017