News Flash

‘टाईमपास २’ची हॉलीवूड स्टाईल प्रसिद्धी

एखाद्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून सतत वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरण्यात येत असतात.

| March 21, 2015 01:16 am

12
एखाद्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून सतत वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरण्यात येत असतात. ‘टाईमपास २’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी असाच अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. ‘टायटॅनिक’ या गाजलेल्या हॉलिवूडपटाच्या धर्तीवर ‘टाईमपास २’ चे पोस्टर तयार करण्यात आले आहे. टायटानिक बोटीच्या पार्श्वभूमीवर रोझ आणि जॅक यांचे प्रेमभावना व्यक्त करणारे पोस्टर चित्रपटरसिकांना चांगलेच परिचयाचे आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘टाईमपास २’ च्या निर्मात्यांनी तरूण वयातील दगडू आणि प्राजूचे ‘टायटॅनिक फेम’ पोस्टर तयार केले आहे. या पोस्टरबरोबर हॉलिवूड असो वा बॉलिवूड… टायटॅनिक असो वा अक्काचा आशिर्वाद.. प्रेमाने जग जिंकता येतं!! असा संदेशही लिहण्यात आला आहे.
‘हम गरीब हुए तो क्या हुआ…’ पासून ‘नया है वह’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ सारखे संवाद गाजलेल्या ‘टीपी’ अर्थात ‘टाईमपास’चा सिक्वल १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘टीपी’मध्ये प्रथमेश परबने दगडूची तर केतकी माटेगांवकरने प्राजूची भूमिका साकारली होती. ‘टीपी’चा सिक्वल अर्थात ‘टाईमपास २’ मध्ये प्राजूची भूमिका प्रिया बापट, तर दगडूची भूमिका प्रियदर्शन जाधव साकारणार आहे.

                                                                                                                  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2015 1:16 am

Web Title: marathi movie time pass 2 poster
टॅग : Marathi Movie
Next Stories
1 ‘आपण ठरवू तो दिवस शुभारंभ’
2 हिंदीतील आघाडीचे संगीतकार अमर मोहिले मराठी चित्रपटनिर्मितीत
3 ‘मर्डर मेस्त्री’ टिमची चैतन्यमयी गुढी
Just Now!
X