भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर तो धर्म आहे. प्रत्येकाला क्रिकेटविषयी प्रचंड आकर्षण असतं. शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही क्रिकेट तितकंच लोकप्रिय आहे. अशाच एका आदिवासी पाड्यावरच्या मुलाच्या क्रिकेट प्रेमाची गोष्ट आपल्याला ‘वेलडन भाल्या’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

आदिवासी पाड्यातला छोटा मुलगा भाल्या. त्याचा बाप शुकऱ्या झाडावरचा मध गोळा करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. फीसाठी पैसे नसल्यामुळे भाल्याची शाळाही सुटलीय. आता फावल्या वेळात क्रिकेट खेळणं हाच भाल्याला नाद. मग आदिवासी असलेल्या भाल्याच्या या क्रिकेट आवडीचं पुढे काय होतं, हे ‘वेलडन भाल्या’ या चित्रपटात पहायला मिळेल.

चित्रपटात रमेश देव, अलका कुबल-आठल्ये, संजय नार्वेकर, नंदकुमार सोलकर, राजेश कांबळे, मिताली जगताप, गणेश यादव, अंशुमन विचारे, शरद पोंक्षे, संजय खापरे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे. भाल्याच्या क्रिकेटप्रेमाची ही कहाणी चुकवू नये अशीच आहे. त्यासाठी पहा वेलडन भाल्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २० मे रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!