पहिल्या पावसाच्या सरी अलगद अंगावर आल्या की प्रत्येक जण सुखावून जातो. अनेक लहान मुलांच्या ओठी ‘येरे येरे पावसा,तुला देतो पैसा’ हे बालगीतही ऐकू येतं. पावसाची अनेक रुपं आहेत. कधी तो लहान मुलांच्या होड्या वाहून नेणारा खोडकर असतो, तर कधी गडगडाट करुन प्रत्येकाला घाबरवून सोडणारा बेताल असतो. त्यामुळे प्रत्येकासाठी पावसाची संकल्पना वेगवगेळी आहे. याच पावसावर आधारित ‘येरे येरे पावसा’ हा चित्रपट असून सध्या चित्रपटावर कौतुकाचा आणि पुरस्कारांचा वर्षाव होताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाला टोकिया इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरविण्यात आलं आहे.

‘6th Top Indie Film Awards Tokyo ’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘येरे येरे पावसा’ला ७ नामांकने मिळाली होती. त्यापैकी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट छायांकन व ध्वनी या दोन विभागांमध्ये पुरस्कार पटकवत बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, दिग्दर्शन, संकलन, संगीत आणि सर्वोत्कृष्ट संकल्पना या विभागांसाठी नामांकन मिळालं होतं.

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
vijay devarakonda sold filmfare
“दगडाचा तुकडा घरात…”, विजय देवरकोंडाने पहिल्या फिल्मफेअर पुरस्काराचा २५ लाख रुपयांत केलेला लिलाव
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

यंदाच्या पावसाने साऱ्यांनाच सुखावले आहे. या वर्षात आमच्या चित्रपटाला टोरंटो, कॅनडा आणि आता टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काररुपी पावती मिळाल्याने आम्ही सुद्धा या आनंदात चिंब झालो आहोत, असं दिग्दर्शक शफक खान म्हणाले.

दरम्यान, पावसाची धमाल आणि लहानांची कमाल दाखवणारा हा चित्रपट नकळत एक मोलाचा संदेश देऊन जातो. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे.