‘पार्टी’ या आगामी मराठी चित्रपटातलं ‘काळजात घंटी वाजते’ हे गाणं नुकतंच सोशल मीडिया साईटवर प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यानं अल्पावधितच अनेक तरूण तरुणींना भुरळ पाडली आहे. पहिल्या प्रेमाचे सुंदर क्षण या गाण्यातून नव्यानं अनुभवायला मिळणार आहेत.

सुव्रत जोशी – प्राजक्ता माळी आणि अक्षय टंकसाळे – मंजिरी पुपाला , रोहित हळदीकर, स्तवन शिंदे यांसारखे कलाकार या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. या रॉमेंटीक गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांनी लिहिले असून अमितराज आणि निहिरा जोशीने ते गायलं आहे.

पहिल्या प्रेमाचे ते सुंदर गुलाबी क्षण या गाण्यातून हळूवारपणे उलगडत गेले आहेत. हे क्षण पडद्यावर पाहताना आपसूकच मन त्या भूतकाळात गुंतून जातं, क्षणाक्षणाला खिळून ठेवणारं हे गाणं तरूणांच्याही पसंतीस उतरत आहे. येत्या ७ सप्टेंबरला पार्टी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.