नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके याना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते.

chandrapur lok sabha marathi news
“सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या”, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी.उषा यांचे मत; म्हणाल्या…
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई

यासंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल असे देशमुख यांनी सांगितले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी दिली आहे.