कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका रोज एक नवं वळण पार करत आहे. यामध्ये आता आणखी एक रंजकदार वळणं येणार असून बाळू लवकरच सीम्मोल्लंघन करणार आहे.

पंच आणि देवप्पाने मिळून बऱ्याच खेळी आणि डावपेच केले पण ते सगळे बाळूने उधळून लावले. पंच आणि देवप्पाच्या प्रत्येक कारस्थानाला बाळूने उत्तर दिलं. त्यामुळे देवप्पा बाळूला गावाबाहेर काढण्यासाठी नवीन योजना आखत आहे. यातच आता भर पडत आहे ती गोदा आणि तिच्या नवऱ्याची. या दोघांनीही बाळूविरोधात नवी तक्रार घेऊन आले आहेत.

बाळूने त्यांच्या घरातली मडकी फोडल्यामुळे मयप्पा त्याच्यावर चिडून त्याला गावाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतो. गावाबाहेर चंदुलाल शहा याला सालगडी हवा असल्यामुळे मयप्पा बाळूला त्याच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेतो. बाळू गावात राहिलाच नाही तर त्याच्याविरोधात कोणी तक्रार करणार नाही. त्यामुळे देवप्पा आणि पंच दोघही शांत होतील हादेखील त्या मागचा एक हेतू असतो.

दसऱ्याच्या दिवशी गावामध्ये असलेल्या प्रथेप्रमाणे गावकरी गावाच्या वेशीवर पूजा करणार आहेत. त्याचवेळी देवप्पा बाळूच्या समोर येणार असून देवप्पा बाळूला आव्हानं देणार कि, मी तुला गावाबाहेर काढणार, बाळू देवप्पाचे हे आव्हान स्वीकारणार . इतकेच नसून बाळू देखील देवप्पाला आव्हान देणार कि तुला बाहेर गावाबाहेर काढण्यासाठी मी गावाची सीमा ओलांडायला देखील तयार आहे .
बाळू गावा बाहेर राहून काय करणार ? देवप्पाला कसे उत्तर देणार ? हे सगळ बघायला विसरू नका तुमच्या आवडत्या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमध्ये सोम ते रवी. संध्या. ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.