रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध धाटणीच्या मालिका सज्ज असतातच. सध्याच्या घडीला मराठमोळ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी अशीच एक मालिका म्हणजे लागिरं झालं जी. एका गावाकडच्या तरुणाची संघर्षगाथा आणि त्यातून उमलणारी प्रेमकथा या साऱ्याची सुरेख बांधणी करत ‘लागिरं झालं जी’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि त्यांच्या मनात घर करुन गेली.
अजय आणि शीतलच्या प्रेमकहाणीलाच देशप्रेमाची जोड देत गावाकडच्या पात्रांना या मानिकेच्या निमित्ताने एक वेगळीच लोकप्रियता प्राप्त झाली. अशी ही मालिका आता एका रंजक वळणावर आली असून, अथक प्रयत्नांनंतर आता अखेर तो भारतीय सैन्यदलात दाखल होत आहे. अज्याचा हा प्रवास प्रेक्षकांना हवाहवासा वाटला. पण, त्याला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली..
वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत
‘झी मराठी’च्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये अज्या म्हणजेच अजिंक्यची भूमिका साकारणाऱ्या नितीश चव्हाण या अभिनेत्याने नेमकी कशी मेहनत घेतली याची झलक पाहायला मिळत आहे. मालिकेतील अतिशय महत्त्वाच्या वळणाचं चित्रीकरण करण्यासाठी आणि हे दृश्य आणखी प्रभावी करण्यासाठी लागिरं झालं जीच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीचं प्रशिक्षण घेणाऱ्या तब्बल ४५० तरुणांच्या साथीने हे कसम परेडचं चित्रीकरण पूर्ण केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 6:20 pm