देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. अशावेळी लॉकडाउनमध्ये घरात असलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठी सज्ज झाली आहे.

सगळीकडे सध्या सर्व नकारात्मक वातावरण पाहायला मिळते. अशा वेळी झी मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे आली आहे. कारण आपल्या आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत. सोशल मीडियावर देखील याचे मीम्स व्हायरल होत आहेत. या परिस्थितीत देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी मराठीने कंबर कसली आहे. झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण आता बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर याठिकाणी होणार आहे.

झी मराठीवरील कोणत्या मालिकांचे चित्रीकरण कुठे होणार पाहूया!
होम मिनिस्टर – घरच्या घरी
पाहिले न मी तुला – गोवा
येऊ कशी तशी मी नांदायला – दमण
अग्गबाई सुनबाई – गोवा
माझा होशील ना – सिल्वासा
चला हवा येऊ द्या – जयपूर
देवमाणूस – बेळगाव

तसेच वेध भविष्याचा माध्यमातून भगरे गुरुजी रोज सकाळी आपल्या भेटीस येणारच आहेत सोबत रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचे नवे भाग देखील तयार आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकांचे भाग पाहायला मिळणार हे नक्की.