17 November 2019

News Flash

सिंधू होणार रानडेंची सून, घरात सुरु झाली लगीनघाई

१९ व्या शतकातील काळ डोळ्यासमोर उभा करणाऱ्या या मालिकेमध्ये सिंधूचा बालविवाह होणार आहे.

अल्पावधीमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी मालिका म्हणजे ‘सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य कथा’. या मालिकेतील चिमुकल्या सिंधूने तिच्या मस्तीखोर स्वभावामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्यामुळे अनेकांना पुन्हा एकदा बालपण अनुभवण्याची संधी मिळाली. मात्र आता सिंधू लवकरच लग्नाच्या बंधनात बांधली जाणार आहे. सिंधुचं देवव्रतसोबत लग्न होणार आहे.

१९ व्या शतकातील काळ डोळ्यासमोर उभा करणाऱ्या या मालिकेमध्ये सिंधूचा बालविवाह होणार आहे. त्यामुळे आता सिंधूच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. घरातील प्रत्येक सदस्य लग्नामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव राहू नये यासाठी सर्वतोपरीने काम करत आहे. त्यातच आता लग्नापूर्वीच्या काही विधींनाही सुरुवात झाली आहे.

अष्टपुत्रे यांची कन्या असलेली सिंधू आता रानडे यांची सून होणार आहे. त्यामुळे आता देवव्रताची सोडमुंज, देव प्रतिष्ठा, हळदी अशी सगळी धमालमस्ती या लग्नात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे कोवळ्या वयात विवाहबंधनात अडकत असल्याने सिंधू असो वा देवव्रत दोघांनाही नेमके लग्न म्हणजे काय याची विशेष कल्पना नाही. मात्र आता यापुढे धाकटी आई भामिनीच्या जाचातून सिंधूची सुटका होईल अशी सगळ्यांना आशा आहे.

First Published on August 23, 2019 5:09 pm

Web Title: marathi serial sindhu child marriage ssj 93