भारताच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णकाळ निर्माण केला ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं कार्यकर्तृत्व बघताना इतिहास रोमांचित झाला आणि त्यांच्या देहावसानाने हाच इतिहास गहिवरला, काळाचा कठोर स्वरही त्याक्षणी कातर झाला. म्हणूनच आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर निर्माण झालेल्या कोणत्याही नाटकात, मालिकेत, चित्रपटात शिवाजी महाराजांच्या निर्वाणाचा प्रसंग दाखवण्यात आलेला नाही.

शिवाजी महाराजांच्या निर्वाणासंबंधी आजही अनेक मतभेद, वाद-विवाद प्रचलित आहेत. त्यासंबधी अनेक गैरसमज आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रसंगाने शोकाकुल केले तो प्रसंग झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. म्हणूनच कोणत्याही नाटक, चित्रपट, आणि मालिकेतून दाखवण्यात न आलेला शिवाजी महाराजांच्या निधनाचा प्रसंग ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत दिसणार आहे.

Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
With the blessings of Udayanaraj i got more strength says shivendrasinh raje
सातारा: महाराजांच्या आर्शिवादाने मला दहा हत्तीचे बळ- शिवेंद्रसिंहराजे
Udayanraje Delhi
शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!

शिवाजी महाराजांच्या निर्वाणाबाबत त्याकाळी प्रचंड गुप्तता पाळली गेली होती, ज्येष्ठ पुत्र असूनही युवराज संभाजी राजांना अंत्यविधीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. या सगळ्या घटनेनंतर संभाजी राजांच्या आयुष्याला काय वळण मिळतं? रायगडावरच्या राजकारण कोणाच्या हातात जातं? अनाजी दत्तो, सोयराबाई आणि कारभारी मिळून कोणते नवे मनसुबे रचतात? औरंगजेबाच्या वाढत्या आक्रमणांना संभाजी राजे कसं थोपवतात?

इतिहासाच्या हृदयात दडलेल्या या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गुरुवार २२ नोव्हेंबर पासून झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा एकही भाग चुकवू नका.