X

VIDEO : ‘राणा दा’ने असा साजरा केला वाढदिवस

हार्दिक मुंबईच्या 'मोरया' ढोल ताशा पथकामध्ये वादनही करायचा.

‘रं मर्दा….’ असं म्हणत ज्या अंदाजात अभिनेता हार्दिक जोशीने झी मराठीच्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं तो अंदाज खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून हार्दिक ‘राणा दा’च्या भूमिकेत झळकला तेव्हापासूनच असंख्य तरुणींच्या मनावर त्याची भुरळ पडली. ‘चालतंय की…’ असं म्हणत कोल्हापूरच्या मातीतील मल्लाची भूमिका साकारणाऱ्या हार्दिकचा आज वाढदिवस. लाडक्या ‘राणा दा’च्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाही देत आहेत.

झी मराठीच्या फेसबुक पेजवरुनही त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हार्दिकने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो केक कापताना दिसत आहे. टेलिव्हिजन विश्वात हार्दिक फार आधीपासून सक्रिय होता. त्याने अनेक मालिकांमध्ये लहानसहान भूमिका साकारल्या होत्या. पण, तो खऱ्या अर्थाने ओळखला जाऊ लागला ते म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे. अक्षया देवधरसोबतची त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी गाजली की, जोडीदार हवा तर अगदी ‘राणा’सारखाच अशीच इच्छा काहीजणींनी व्यक्त केली.

‘राणा दा’च्या स्वभावातील साध्याभोळ्या आणि रांगड्या गुणांच्या मिश्रणामुळे ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली. या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या हार्दिकने ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात ‘एसीपी पाठक’ची भूमिका साकारली होती. त्याशिवाय ‘स्वप्नांच्या पलिकडले’ या मालिकेतूनही तो झळकला होता. अभिनयाव्यतिरिक्त हार्दिक मुंबईच्या ‘मोरया’ ढोल ताशा पथकामध्ये वादनही करायचा. त्याचं हे एकंदर वर्तुळ पाहता हार्दिक सच्चा कलाप्रेमी आहे असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

First Published on: October 6, 2017 9:12 am
Outbrain