28 February 2021

News Flash

मीरा- समीरच्या नात्यात अविश्वासाचं वादळ?

त्यांच्या नात्यातील दुरावा मिटेल का?

'तुझं माझं ब्रेक अप'

अवघ्या काही दिवसांमध्ये फक्त गृहिणींमध्येच नव्हे तर तरुणाईमध्येही लोकप्रिय झालेल्या ‘तुझं माझं ब्रेक अप’ या मालिकेत आता एक नवं वळण येणार आहे.  गोड गुलाबी प्रेमातून, छोट्या-मोठ्या वादातून मीरा आणि समीरच्या नात्याची जडणघडण होतेय. कधी अबोला, कधी प्रेम समीर आणि मीराच्या नात्यात विविध भावनांची गुंफण बघायला मिळते. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं हे जोडपं अनेक अडचणींना आजवर एकत्र सामोरी गेलंय. यातून त्यांचं प्रेम बहरत गेलं, नात्यातील विश्वास दृढ होत गेला, पण आता एका गैरसमजामुळे समीर आणि मीराच्या नात्यात निर्माण होणार आहे अविश्वासाची दरी! देसाई कुटुंबाचा विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली मीराला अटक करण्यासाठी पोलीस थेट देसाई कुटुंबासमोर उभे राहणार आहेत.

आजीकडून १० लाख रुपये घेऊन मौलिकचं घरातून अचानक गायब होणं, मीराच्या सासूच्या पथ्यावर पडलं आहे. मीराला छळण्याची एकही संधी न सोडणाऱ्या तिच्या सासूसाठी ही आनंदाची बातमी आहे. मौलिकला प्यादं बनवून मीराला चीतपट करण्यासाठी आता तिच्या सासूनं कंबर कसल्यामुळे आता मीरा खिंडीत सापडली आहे. यावेळी तिला समीरच्या सोबतीची नितांत गरज आहे. माहेर आणि सासरच्या मंडळींकडून मीराला एकटं पाडण्यात आलं आहे. संकटात अडकलेल्या मीराला गरज आहे समीरच्या साथीची, मात्र गैरसमजामुळे समीरनेसुद्धा मीराची साथ देण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे समीर-मीरामधील विश्वासाच्या नात्याला तडा गेला आहे.

‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

परिस्थिती बिघडत असली तरीही मीरा आणि समीरच्या नात्यातील ही दरी भरून काढण्यासाठी आजी मीराला एक संधी देणार आहेत. मौलिकला शोधून काढण्याचं आव्हान आजी मीराला देणार आहे. या कामात मीराला मदत करण्यासाठी आजी समीरचं नावही पुढे करणार आहेत. मौलिकच्या शोधकार्याच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले मीरा-समीर पुन्हा एकत्र येतील, अशी आजींची आशा आहे आणि यामुळे मौलिकचा शोध घेण्यासाठी दोघांना एकत्र येण्याचे आव्हान आजी देणार आहे. समीर आणि मीरामध्ये निर्माण झालेली ही अविश्वासाची दरी भरून येईल का? मीरा आणि समीरला एकत्र आणण्याची आजीची ही खेळी यशस्वी होईल का? मौलिकचा शोध लागेल का? मीरावर करण्यात आलेल्या आरोपांमधून तिची सुटका होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतीलच.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 1:03 pm

Web Title: marathi serial tuza maza breakup new episode
Next Stories
1 Padmaavat row : गुजरातमधील चित्रपटगृहाला ‘पद्मावत’चा फटका
2 Filmfare Awards 2018 winners list : ‘हिंदी मीडियम’सह विद्याच्या ‘सुलू’ने फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मारली बाजी
3 ‘सर्वच माध्यमांवर सेन्सॉरशीप आणा’
Just Now!
X