News Flash

…म्हणून आर्या आंबेकरसाठी खास आहे ‘ही’ साडी

आर्याने शेअर केला खास फोटो

आपल्या गोड आवाजाने कानसेनांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. गायनक्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनय क्षेत्रातदेखील तिचं नशीब आजमावलं आहे. त्यामुळे आज तिचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आर्याने एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तिने तिच्या आईप्रती असलेलं प्रेमदेखील व्यक्त केलं आहे.

आर्याने दिवाळीनिमित्त एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली असून हातात पणती धरली आहे. विशेष म्हणजे तिने नेसलेली साडी तिच्या आईची आहे. तर तिचा हा सुंदर फोटो तिच्या वडिलांनी कॅमेरात कैद केला आहे. हा फोटो शेअर करत तिने आई-वडिलांविषयी प्रेम व्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

दरम्यान, आर्या आंबेकर हे नाव आता मराठी कलाविश्वाला नवीन राहिलेलं नाही. उत्तम आवाजा आणि अभिनय यांच्या जोरावर आज ती लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. झी मराठीवर २००८ मध्ये रंगलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोने आर्या आंबेकरला खरी ओळख मिळवून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 1:23 pm

Web Title: marathi singer and actress aarya ambekar new photo diwali ssj 93
Next Stories
1 फटाक्यांच्या पॅकेट्सवर परिणीतीचे फोटो; ‘इकोफ्रेंडली दिवाळी’ म्हणणारी अभिनेत्री होतेय ट्रोल
2 ‘मी दृष्ट काढते…’; दिवाळीनिमित्त आशा भोसले यांची खास पोस्ट
3 भव्य रांगोळीतून साकारले ‘सरसेनापती हंबीरराव’चे पोस्टर
Just Now!
X