News Flash

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधील या’ चिमुकलीला ओळखलं का ? सौंदर्यामुळे करते आज अनेकांना घायाळ

ओळखा 'या' चिमुकलीला; आज करते अनेकांच्या मनावर राज्य

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे कोणत्याही दूर कोसावर असलेल्या व्यक्तीशी आपण सहज संपर्क करु शकतो. म्हणूनच, अनेक सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतात. यात इन्स्टाग्राम, ट्विटर व फेसबुक यासारख्या माध्यमातून सेलिब्रिटी व्यक्त होतात. चाहत्यांशी संवाद साधतात. तर काही वेळा ते फोटो, व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या जीवनातील अपटेड्स देत असतात. यात अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात.

अलिकडेच मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या दुसऱ्या वाढदिवशी काढल्याचं तिच्या कॅप्शनवरुन लक्षात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आंबेकर हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला नवीन नाही. गोड आवाजाबरोबरच आर्याच्या सौंदर्यानेदेखील अनेकांना भूरळ घातली आहे. त्यातच आर्याने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

दरम्यान, आर्याचा आज अफाट मोठा चाहतावर्ग तयार झाला असून तिच्याविषयी प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. आर्यादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच दिवाळीनिमित्त आर्याने तिचे खास फोटो शेअर केले होते. या फोटोचीदेखील चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 3:21 pm

Web Title: marathi singer and actress aarya ambekar share new childhood photo ssj 93
Next Stories
1 अरारारा खतरनाकऽऽऽऽ… आता पुन्हा होणे नाही; भिडेंच्या निधनानंतर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट
2 सलमानचा ‘अंतिम’मधला लूक व्हायरल, पाहा व्हिडीओ
3 रणबीरनेच रणवीरला दिला फर्स्ट ब्रेक; ‘हे’ काम देत संपवला ६ वर्षांचा वनवास
Just Now!
X