‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली गायिका कार्तिकी गायकवाडने अलिकडेच रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कार्तिकी आणि रोनितचीच चर्चा रंगली आहे. लग्नानंतर कार्तिकीने सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर आता तिने एका खास व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे पारंपरिक नऊवारी साडी आणि दागिण्यांमध्ये कार्तिकीचं सौंदर्य चांगलंच खुललं असून तिची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
जुलै महिन्यामध्ये कार्तिकी आणि रोनितचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर कार्तिकीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये तिचा आणि रोनितचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चिला जात आहे.
View this post on Instagram
“जरीच्या साडीत किती सजून-धजून..गुणाची दिसतेस गं,माझी नवरी दिसतेस गं..”या गाण्यावर कार्तिकीने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोनित आणि कार्तिकीचा रोमॅण्टीक अंदाज पाहायला मिळत आहे.
पाहा : ५०० रूपये घेऊन मुंबईत आलेल्या मेगास्टार रवी किशनकडे आज आहे ८ हजार स्क्वेअर फुटांचं भव्य घर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 11:22 am