चीनमधून उद्रेक झालेल्या करोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच अनेक जण या संकटातून सुखरुप बचावल्याचंही पाहायला मिळालं. त्यातच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनादेखील करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा हा अनुभव शेअर केला आहे.

आतापर्यंत सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यात बॉलिवूडमधील काही दिग्गज सेलिब्रिटींचाही समावेश होता. यातच गायक मिलिंद इंगळे यांनाही करोनाची लागण झाली होती. मिलिंद इंगळे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत करोनाविरुद्धच्या लढाईचा प्रवास कसा होता हे सांगितलं.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Hansal Mehta once avoided son Jai Mehta
‘गँग्स ऑफ वासेपूर’चा असिस्टंट डायरेक्टर अपघाती मरण पावला अन्…; हंसल मेहतांनी सांगितला मुलाच्या रुममेटचा ‘तो’ प्रसंग

“करोनाची लागण झाल्याचं लक्षात आल्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि पालिकेची परवानगी घेऊन घरीच स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतलं. सुरुवातीच्या काळात मला फारसा त्रास जाणवला नाही. मात्र काही दिवसानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून मी नानावटी रुग्णालयात अॅडमिट झालो. इथे योग्य उपचार घेतल्यानंतर मला घरी पाठविण्यात आलं. त्यानंतर पुन्हा मी १४ दिवस घरीच सेल्फ क्वारंटाइन झालो. त्यामुळे आता मी करोनामुक्त झालो आहे असं मला वाटलं. परंतु परिस्थिती वेगळीच होती. काही दिवसांनंतर मला परत अस्वस्थ वाटू लागलं.या त्रासानंतर मला पुन्हा रुग्णालयात जावं लागलं. त्यावेळी करोनाचा संसर्ग माझ्या शरीरातील अन्य भागांवर झाल्याचं लक्षात आलं. यावेळी मनात भीती होती. मात्र या सगळ्याला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे या आत्मविश्वासामुळे मी साऱ्याला सामोरं गेलो आणि या संकटावर मात केली,” असं मिलिंद इंगळे यांनी सांगितलं.

दरम्यान, या संकटकाळात खचून न जाता धैर्याने या सगळ्याला सामोरं जाणं गरजेचं आहे हेदेखील त्याने सांगितलं. तसंच या काळात डॉ.अनुजा वैद्य आणि आयुर्वेदिक डॉ. राजीव कानेटकर यांची विशेष मार्गदर्शन आणि मदत मिळाल्यामुळे त्यांचे आभारही मिलिंद इंगळे यांनी मानले.