News Flash

रॉकिंग राऊत!

हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं

‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्स फेम महाराष्ट्राचा आवडता तरुण गायक रोहित राऊतला नुकत्याच पार पडलेल्या रेडिओ मिरची संगीत पुरस्कारांमध्ये, ‘बेस्ट फिल्म सॉंग ऑफ द इयर: हृदयात वाजे समथिंग’ आणि ‘बेस्ट अल्बम ऑफ द इयर: ती सध्या काय करते’ साठी २ पुरस्कार देण्यात आले. रोहितला या पुरस्कार सोहळ्यात एकूण ३ गटात नामांकनं होती, त्यापैकी २ गटात परीक्षकांच्या बहुमतांनी त्याने पुरस्कार पटकावले.

याबद्दल आनंद व्यक्त करताना रोहित म्हणतो, “हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं. मला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला तो म्हणजे माझ्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी, माझ्या मित्रांनी आणि अर्थात घरच्यांनी. त्यांनी माझ्यावर केलेलं जीवापाड प्रेम आणि त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळेलेले पुरस्कार हे माझ्यासाठी अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन असतं व माझ्या परीने मी नक्कीच उत्तम काम करत राहीन.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 8:25 pm

Web Title: marathi singer rohit raut wins 2 awards in radio mirchi sangeet awards
Next Stories
1 १२ वर्षांनी ही सुपरहिट जोडी टीव्हीवर करणार ‘कमबॅक’
2 जेनिफर विंगेटच्या ‘बेपनाह’मध्ये दिसणार प्रेमाची नवी छटा
3 मराठी गायिकेचा फेसबुक अकाऊंट हॅक
Just Now!
X