भय, रहस्य, साहसाची गोष्ट सांगणारे नवनवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या प्रकारातील चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. ताजं उदाहरण द्यायचं झालं तर ‘तुंबाड’. रहस्य, लालसा, भय, साहस अशा सर्व गोष्टी मिळून तयार झालेल्या ‘तुंबाड’ने प्रेक्षक- समीक्षकांची मनं जिंकली. असाच आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. ‘होरा’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतंच करण्यात आलं.
म्युझिक लाँच कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मोहन जोशी, खासदार अनिल शिरोळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत घरत व मनोज एरूनकर यांनी केलं असून राहुल म्हात्रे हे निर्माते आहेत. या चित्रपटाविषयी सांगताना अभिनेते अशोक शिंदे म्हणाले, ‘होरा हा स्पॅनिश शब्द आहे. ‘होरा’ म्हणजे ‘वेळ’. एक वाटसरू रात्रीच्या वेळी रस्ता चुकतो आणि एका बंगल्यात मुक्कामासाठी थांबतो. इथूनच सुरू होतो रहस्यमयी सावल्यांचा खेळ. तो वाटसरू कशाप्रकारे होराच्या चक्रव्यूहात अडकतो आणि त्यातून कसा बाहेर पडतो हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 7:09 pm