News Flash

‘तुझं माझं जमतंय’फेम रोशन विचारेची सोशल मीडियावर चर्चा

रोशनने यापूर्वी ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांमध्ये काम केलं आहे

छोट्या पडद्यावर अलिकडेच प्रदर्शित झालेली मालिका म्हणजे ‘तुझं माझं जमतंय’. नुकतीच सुरु झालेली ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील शुभंकर हा अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाल्याचं दिसून येत आहे.

‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत रोशन मुख्य भूमिकेत झळकला असून यापूर्वी त्याने लक्ष्मी नारायण’,‘स्वराज्य जननी जिजामाता’ या पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, तुझं माझं जमतंय या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून जास्त पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्याच्या नावाची चर्चा रंगत असून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत लवकरच त्याच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेपूर्वी रोशनने ‘लक्ष्मी नारायण’ या पौराणिक मालिकेत ‘नारायण’ची भूमिका साकारली होती. तर, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकेत ‘शहाजी राजे भोसले’ यांची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 5:20 pm

Web Title: marathi tv actor tujha majha jamtay fame roshan vichare famous ssj 93
Next Stories
1 मुन्नाभैय्या शेतकऱ्याच्या रुपात; ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
2 ‘आव्हानात्मक भूमिका साकारायला मला आवडतं’, तुझं माझं जमतंय मालिकेतील अभिनेत्याचा खुलासा
3 जुही चावलाचे आलिशान घर पाहिलेत का?
Just Now!
X