News Flash

मराठी कलाकारांच्या कुटुंबातील करोना योद्धे; जीवाची पर्वा न करता देतायत लढा

पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी हे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र झटत आहेत.

करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी हे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र झटत आहेत. या करोना योद्धांमध्ये मराठी कलाकारांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीची मावशी, डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत वच्छीची भूमिका साकारणाऱ्या संजीवनी पाटीलचे पती, ‘विठू माऊली’ मालिकेतील अजिंक्य राऊतची आई हे करोना योद्धा म्हणून काम करत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीची सख्खी मावशी पुण्याच्या भारती हॉस्पीटलमध्ये सीनिअर नर्स म्हणून काम करत आहेत. कोविड १९ रुग्णांच्या वॉर्डमध्येत त्या काम करत आहेत. सलग १५ दिवस त्या वॉर्डमध्ये ड्युटी केल्यानंतर पुढील १५ दिवस त्यांना स्वत:ला क्वारंटाइन करायचं असतं. तर महिनाभर त्यांना घरी न जाता हॉस्टेलमध्येच राहण्याचे आदेश आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबीयांपासून लांब राहून त्या करोना रुग्णांची सेवा करत आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी अमोल कोल्हे यासुद्धा करोना विरोधात मैदानात उतरल्या आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या रुग्णांची सेवा करत आहेत. डॉ. अश्विनी कोल्हे या केईएम रुग्णालयात २००९ पासून कार्यरत आहेत. त्या रोज सकाळी उठून घरातील कामं, दोन्ही मुलांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था करून रोजच्या वेळेवर हॉस्पीटलमध्ये हजर असतात. हॉस्पीटलमधील इतर सहकाऱ्यांसोबत मिळून त्या रुग्णांची सेवा करत आहेत. डॉक्टर म्हणून ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.

‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटीलचे पती पोलीस दलात हेट कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. आपलेच रक्षण करणाऱ्या पोलिसांना मारहाण करणाऱ्या घटना समोर आल्यावर माझा खूप संताप होतो, असं त्या म्हणतात. त्याचसोबत करोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी घरीच थांबलं पाहिजे, असं आवाहन त्या लोकांना करतायत.

‘विठू माऊली’ या मालिकेत काम करणाऱ्या अजिंक्य राऊतची आई परभणी येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत आहेत. जास्तीत जास्त वेळ ड्युटी बजावत त्या रुग्णांची सेवा करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 11:07 am

Web Title: marathi tv actors whose loved ones are working as covid19 frontline warriors ssv 92
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये बिपाशाची विनामेकअप लूकला पसंती
2 मदतकार्य पाहून भारावला विकास खन्ना; सोनू सूदसाठी तयार केली खास ‘मोगा डिश’
3 ‘त्या’ मुलाखतीत सुनील दत्त नर्गिससमोर एक शब्दही बोलू शकले नव्हते
Just Now!
X