News Flash

शेवंता झाली शेफ; पाहा घरी बसून काय करतेय?

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

apurva nemlekar
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

करोना व्हायरसमुळे सर्व शूटिंग रद्द झाले आहेत. सामान्यांप्रमाणेच आता सेलिब्रिटीसुद्धा घरीच बसले आहेत. मात्र घरी बसून ते काय काय करत आहेत हे सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. त्याचप्रमाणे लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्नही करत आहेत. अशातच ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

क्वारंटाईन वेळेचा सदुपयोग करत अपूर्वा खाद्यपदार्थ बनवण्यात रमलीय. अपूर्वाने घरच्या घरीच पाणीपुरी आणि भेळपुरी बनवली आहे. कुटुंबीयांसोबत ती घरीच पाणीपुरी-भेळपुरी खाण्याचा आस्वाद घेत आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘शेवंता झाली शेफ’ अशा प्रतिक्रिया तिच्या या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा : लंडनमध्ये कनिकाला भेटल्याने प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण? जाणून घ्या सत्य

फक्त शेवंताच नाही तर अण्णा नाईक अर्थात अभिनेते माधव अभ्यंकरसुद्धा किचनमध्ये वेळ घालवत आहेत. अण्णांचाही जेवण बनवतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केल्याने आता २१ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे घरीच असलेले हे कलाकार विविध कामांत स्वत:ला गुंतवून घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 10:56 am

Web Title: marathi tv actress apurva nemlekar aka shevanta turns chef ssv 92
Next Stories
1 Coronavirus : ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’; सोनू निगम संतापला
2 कनिकाच्या निष्काळजीपणावर तापसी म्हणाली…
3 Fact check : लंडनमध्ये कनिकाला भेटल्याने प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण? जाणून घ्या सत्य
Just Now!
X