‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतील सिद्ध आहे, मी स्वयंसिद्ध…’ हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसत आहे. हा संवाद मालिकेतील खलनायक विराट याचा असून ही भूमिका अभिनेता मिलिंद शिंदे साकारत आहेत. विराट हे मालिकेतील खलनायकी पात्र असलं तरीदेखील ते प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरत आहे. या मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट येत असून आता आर्या आणि विराट समोरासमोर येणार आहेत.

मालिकेत आर्या म्हणजे आई काळुबाई आहे तर विराट एक दैत्य आहे. त्यामुळे आगामी भागात आई काळुबाई आणि या दैत्याचा सामना होणार आहे. तसंच या दैत्याचा पुनर्जन्म होणं आणि आई काळुबाईने त्याच्याशी केलेली लढाई या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
olympic sports bodies criticize on cash prizes by athletics organizations
अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या रोख पारितोषिकाच्या भूमिकेला वाढता विरोध
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

दरम्यान, आता आर्याला म्हणजेच काळुबाईला रोखण्यासाठी विराट कोणकोणते संकट आणि अडथळे निर्माण करेल हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही आर्याचं पात्र साकारत आहे तर अलका कुबल काळुबाईची भूमिका साकारत आहेत.