छोट्या पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच गाजलेली मालिका म्हणजे ‘शुभमंगल ऑनलाईन’. सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असून यात अभिनेत्री सायली संजीव आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत झळकले आहेत. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या या मालिकेने अलिकडेच १०० भागांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
सध्याच्या काळात प्रत्येक जण सोशल मीडियाच्या आहारी गेला आहे. त्यामुळे याच संकल्पनेवर आधारित ही मालिका आहे. शर्वरी आणि शंतनू या दोघांची एका व्हिडीओ कॉलवर ओळख होते आणि त्यांचं लग्नदेखील ऑनलाइनच होतं. परंतु, त्यांच्या संसारात आता ऐश्वर्याची एण्ट्री झाली आहे आणि संपूर्ण गणित फिसकटून गेलं आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या आल्यामुळे दिवसेंदिवस ही मालिका रंजक वळणावर पोहोचत आहे. यातच या मालिकेने १०० भागांचा टप्पा गाठला आहे.
मालिकेने १०० भाग पूर्ण केल्यामुळे सेटवर मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी मालिकेच्या टीमने मोठा केक कापत आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये सुकन्या कुलकर्णी मोने, सायली संजीव, सुयश टिळक, सुबोध भावे, मंजिरी भावे यांच्या आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 4:28 pm