31 October 2020

News Flash

‘जीव झाला येडापिसा’मधील शिवा-सिद्धीने सुट्टीत जोपासला ‘हा’ छंद

सिद्धीने कोणता छंद जोपासलाय माहितीये?

करोना विषाणूमुळे सध्या देशभरात भीतीचं वातावरण आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं नागरिक टाळत आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले असून फिल्मसिटीदेखील १९ ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ‘इम्पा’ या संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट, मालिका, जाहिराती यांचं चित्रीकरण काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सगळेच कलाकार घरी आहेत. परंतु घरी राहून हे कलाकार नेमकं करतायेत तरी काय असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.  मात्र ही कलाकार मंडळी त्यांचा वेळ सत्करणी लावत असून कोणी वाचन,लेखन यासारखे आवडीचे छंद जोपासताना दिसत आहेत. यामध्येच सगळ्यांचे लाडके शिवा आणि सिद्धीदेखील त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवताना दिसत आहेत.

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे शिवा आणि सिद्धी. या दोघांनीही कमी कालावधीत तुफान लोकप्रियता मिळविली आहे. त्यामुळे सध्या हे दोघं सुट्टीत नेमकं काय करतायेत हे त्यांनीच सांगितलं आहे. शिवा ही भूमिका साकारणारा अशोक सध्या घरी राहून त्याच्या आवडत्या कामात मन रमवत आहे. अशोकला वाचनाची आवड आहे. त्यामुळे तो सध्या पुस्तक वाचनावर त्याचं लक्ष केंद्रित करत आहे.

“एरवी मालिकेच्या चित्रीकरण असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी करायच्या राहून जातात, बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे सध्या मिळालेल्या या सुट्टीत मी माझ्या आवडत्या गोष्टींकडे लक्ष देत आहे”,असं अशोक म्हणाला.

दरम्यान, सिद्धी म्हणजे विदुलादेखील तिचा छंद जोपासत आहे. विदुलाला झाडे लावण्याची फार आवड आहे. त्यामुळे सध्या ती झाडं लावण्यात तिचा वेळ घालवत आहे.  तसंच जी झाडं तिच्याकडे पूर्वीपासून आहेत. त्यांची ती विशेष काळजी घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 4:16 pm

Web Title: marathi tv show jeev jhala yedapisa fame actor ashok and vidula in quarantining ssj 93
Next Stories
1 कनिकाच्या संपर्कात आलेल्या ३५ पैकी ११ जाणांचे रिपोर्ट निगेटीव्ह, बाकी २४ लोकं…
2 रुग्णालयात दाखल न होताच अभिनेत्रीने केली करोनावर मात
3 coronavirus : घरी राहून नुसरत जहाँ काय करत असतील? पाहा व्हिडीओ
Just Now!
X