27 November 2020

News Flash

‘जिगरबाज’मध्ये दिसणार प्रतीक्षा लोणकरांचा नवा अंदाज; साकारणार ‘ही’ भूमिका

जाणून घ्या, प्रतीक्षा लोणकर यांच्या भूमिकेविषयी

दमदार अभिनय कौशल्य आणि प्रत्येक भूमिकेत प्राण ओतून काम करणारी अभिनेत्री म्हणजे प्रतीक्षा लोणकर. आतापर्यंत विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रतीक्षा लोणकर लवकरच जिगरबाज या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

सोनी मराठी वाहिनीवर ‘जिगरबाज’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सत्तेविरुद्ध सत्याचा संघर्ष आणि डॉक्टरांचं आयुष्य यावर भाष्य करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कायम सालस, मायाळू आई, बहिणी अशा भूमिका साकारणाऱ्या प्रतीक्षा लोणकर या मालिकेत खलनायकी रुपात पाहायला मिळणार आहेत.

या मालिकेमध्ये प्रतीक्षा लोणकर या मॅडम डॉक्टर ही भूमिका साकारत आहेत. मॅडम देशमुख या कटकारस्थान रचणाऱ्या असून गावातल्या लोक-आधार या एकमेव हॉस्पिटलच्या मालकीन आहेत. मात्र, स्वत:च्या स्वार्थासाठी हे हॉस्पिटल बंद करुन त्याठिकाणी कमर्शिअल सेंटर उभं करण्याचा त्यांचा मानस आहे.

दरम्यान, या मालिकेत प्रतीक्षा लोणकर यांच्यासोबत अरुण नलावडे, पल्लवी पाटील अमृता पवार, श्रेयस राजे आणि विजय पाटील ही कलाकार मंडळी झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 2:44 pm

Web Title: marathi tv show jigarbaaz marathi actress pratiksha lonkar ssj 93
Next Stories
1 Birthday Special : या प्रश्नाचे उत्तर देत सुष्मिता सेनने जिंकला होता ‘मिस युनिव्हर्स’चा किताब
2 बहीण कृष्णाचा बोल्ड अंदाज पाहून टायगर झाला अवाक्; म्हणाला…
3 सेलिना जेटलीच्या मुलाचा झाला होता मृत्यू, पोस्ट शेअर करत झाली भावूक
Just Now!
X