छोट्या पडद्यावर कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे माझा होशील ना. अवघ्या काही भागांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवली. त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातच सध्या आदित्य आणि सई यांच्या नात्यात एक नवीन वळण आलं आहे. त्यामुळे आदित्य आता सईसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

सईसोबत असलेलं नातं अजूनपर्यंत त्यालादेखील नीट उलगडलं नव्हतं. आपण मित्र आहोत की आपल्यात प्रेमभावना आहे, या प्रश्नातच तो अडकला होता.मात्र आदित्यला आता त्याच्या प्रेमाची जाणीव झाली असून गुरुवारी होणाऱ्या भागात तो सईसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे.

colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
Vijay Kondke movie Lek Asavi Tar Ashi trailer released
‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जबरदस्त ट्रेलर
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

आदित्यला सई आवडते हे तो सगळ्यात पहिले बंधूमामाला सांगतो आणि बंधूमामाच्या सांगण्यावर तो सईला भेटून त्याच्या मनातली गोष्ट सांगणार आहे. पण आदित्यच्या या भावना सईपर्यंत पोहोचतील का ती त्याला होकार देईल का की त्यांच्या नात्यात दुरावा वाढेल हे येत्या गुरुवारीच प्रेक्षकांना कळणार आहे.