News Flash

 मेघना-आदित्यचा साखरपुडा मोडणार? ‘माझा होशील ना’मध्ये नवा ट्विस्ट

मालिकेत येणार रंगतदार वळण

छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत सध्या अनेक रंगतदार वळणं पाहायला मिळत आहेत. सई आणि आदित्य यांच्या नात्यात बरीच उलथापालथ झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा मेघना फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत मेघनाने थेट आदित्यशी साखरपुडा करणाऱ्याचा घाट घातला आहे. परंतु, हा साखरपुडा मेघना स्वत:च मोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सई आणि आदित्य दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम आहे. मात्र, त्यांची ही प्रेमभावना ते जाणूनबुजून एकमेकांपासून लपवत आहेत. एकीकडे आदित्य आणि मेघनाचा साखरपुडा होणार असल्यामुळे सई नाराज आहे. तर आदित्यदेखील मनाविरुद्ध हा साखरपुडा करण्यास तयार झाला आहे.

आदित्यला साखरपुडा करण्याची इच्छा नसल्याचं मेघनाला पूर्णपणे ठावूक आहे. मात्र, तरीदेखील ती अट्टाहासाने हा साखरपुडा करण्याचा निर्णय घेते. विशेष म्हणजे या कथेत अनपेक्षितपणे एक ट्विस्ट घडणार आहे. साखरपुड्यासाठी हट्ट करणारी मेघनाच हा साखरपुडा मोडणार असल्याचं दिसून येत आहे. खरं तर मेघना हा निर्णय का घेते, ती खरंच हा साखरपुडा मोडणार का की ही तिची नवीन खेळी असणार आहे हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 5:31 pm

Web Title: marathi tv show majha hoshil na meghna and aditya engagement break ssj 93
Next Stories
1 रितेश सोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर करत जेनेलिया म्हणाली…
2 सिद्धार्थ- मितालीनंतर ‘ही’ लोकप्रिय जोडी अडकणार लग्नबंधनात, केळवणाचे फोटो व्हायरल
3 प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा : ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर दिग्गजांची हजेरी
Just Now!
X