News Flash

निलेश साबळेच्या कार्यक्रमात ओम-स्वीटूची हवा; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगला विशेष भाग

'या' दिवशी पाहता येणार प्रेक्षकांना हा खास भाग

गेल्या ६ वर्षांपासून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मराठी रसिकप्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मंचावर आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. कधी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, तर कधी धम्माल मस्ती करण्यासाठी अनेक कलाकार या मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. अलिकेडच या कार्यक्रमात लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायलामधील कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या भागात ओम आणि स्वीटूने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

सध्या छोट्या पडद्यावर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका तुफान गाजत आहे. या मालिकेतील कलाकारांनी अलिकडेच ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेत हजेरी लावली. या कार्यक्रमात कलाकारांनी मनमुराद गप्पा मारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विशेष म्हणजे या कलाकारांसोबत मालिकेतील एका खास पाहुण्यानेदेखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

मालिकेतील ओम, स्वीटू, नलू आणि शकू या व्यक्तींसोबतच खानविलकर कुटुंबातील एक सदस्य ‘जादू’ हादेखील सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. याच जादूनेदेखील ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली होती. दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर रंगलेला हा भाग १ ते ३ मार्च दरम्यान प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 2:31 pm

Web Title: marathi tv show yeu kashi tashi me nandayala actors chala hawa yeudya ssj 93
Next Stories
1 सारा अली खानचा बहिणीसोबतचा फोटो पाहिलात का?
2 ऐन लग्नात अंकुशराव पाटलांची एण्ट्री; निर्विघ्नपणे पार पडेल का प्रियांका-राजवीरचं लग्न?
3 आर्ट एक्झिबिशनमध्ये सलमानच्या चित्राचा समावेश; पोस्ट शेअर करत म्हणाला…
Just Now!
X