गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती अभिनेता निखील चव्हाण आणि त्याच्या डार्लिंगची. निखीलच्या जीवनात आलेली डार्लिंग कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, ही डार्लिंग म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून त्याचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात निखील मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतंच या चित्रपटातलं डार्लिंग तू हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
सध्या सोशल मीडियावर डार्लिंग तू हे गाणं चांगलंच गाजत असून हे गाणं ऐकल्यानंतर आपोआप तरुणाईचे पाय थिरकायला लागतील असं दिसून येत आहे. हे गाणं निखील आणि अभिनेत्री रितीका श्रोत्री यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. सोबतच अभिनेता प्रथमेश परबदेखील यात झळकला आहे.
समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिंगमधील हे गाणं महेश खोमणे यांनी गायलं असून महेश-चिनार यांनी संगीत दिलं आहे. दरम्यान, ‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघे-या’ या सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील ‘डार्लिंग’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरणार आहेत. हा चित्रपट ७ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 4:10 pm