18 March 2019

News Flash

सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखलेचा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विनोदी चित्रपटात अभिनेता सौरभ गोखले व सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची निर्मिती अमोल उतेकर यांनी केली असून कथा व दिग्दर्शन प्रदीप मेस्त्री यांनी केले आहे.

या चित्रपटाची कथा बाब्या (सिद्धार्थ जाधव) व समीर (सौरभ गोखले) या दोघांभोवती फिरते. हे दोघे चाळीत राहणारे असतात. समीरचे वयाच्या चोवीसनंतर आईच्या वडिलांची कर्ज फेडण्यात जातात. त्यानंतर आईच्या तब्येतीमुळे वयाची एकतीशी उलटते आणि त्याचे लग्न जमत नसते. म्हणून त्याच्या घरातले त्याला एका बाबाकडे (महेश मांजरेकर) घेऊन जातात. ते बाबा जे सांगतात ते सगळे खरे होत असते. समीरच्या अगदी उलट बाब्या असतो. बाब्याच्या लग्नात त्याची एक्स गर्लफ्रेंड गोंधळ घालते. त्या गोंधळात समीर बाब्याला कसा सोडवतो, यावर आधारीत चित्रपट आहे.

या चित्रपटातील हलक्या फुलक्या विनोदामुळे प्रेक्षकांचे पूरेपूरे मनोरंजन होणार आहे, असे निर्माते अमोल उतेकर यांनी सांगितले. या चित्रपटात महेश मांजरेकर, सौरभ गोखले व सिद्धार्थ जाधव यांच्यासह संस्कृती बालगुडे, राणी अग्रवाल, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी, कमालकर सातपुते, माधवी सोमण, प्रियांका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, हितेश संपत, शिवाजी रेडकर व गौरव मोरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on November 8, 2018 7:46 pm

Web Title: marathi upcoming movie sarva line vyast aahet motion poster released