करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि तो देशातून नष्ट करण्यासाठी सध्या लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या देशातील सारे नागरिक घरीच बसून त्यांचे छंद, आवड जोपासत आहेत. विशेष म्हणजे ज्या तरुण-तरुणींना डॉक्युमेंट्री , व्हिडीओशूट करण्याची आवड आहे. त्यांच्यासाठी एक भन्नाट संधी चालून आली आहे. व्हायरस मराठीने एक नवीन उपक्रम सुरु केला असून यात नवोदितांना त्यांच्या शॉर्टफिल्म,डॉक्युमेंट्री सादर करायची संधी मिळाणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत निवड झालेल्या शॉर्टफिल्म,डॉक्युमेंट्री Virus मराठीच्या YouTube प्रदर्शित होणार असून त्यांना पारितोषिकही देण्यात येणार आहे.
ज्या तरुणांना किंवा तरुणींना शॉर्टफिल्म,डॉक्युमेंट्री करण्याची आवड आहे, अशांनी मोबाईल किंवा अन्य साधनांच्या माध्यमातून घरच्या घरी एक शॉर्टफिल्म किंवा डॉक्युमेंट्री तयार करायची आहे. ही शॉर्टफिल्म किंवा डॉक्युमेंट्री तयार झाल्यानंतर स्पर्धकांनी ती व्हायरस मराठीला पाठवायची आहे. त्यानंतर या स्पर्धेचे परीक्षक या दोन्ही विभागातून तीन-तीन शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेंट्रीची निवड करतील. या स्पर्धेच्या परीक्षकांच्या भूमिकेत लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी , दिग्दर्शक संतोष कोल्हे आणि दिग्दर्शक समीर पाटील हे काम पाहणार आहेत.

पारितोषिकाचं स्वरुप-
या आगळ्या वेगळ्या डिजिटल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंट्री दोन्ही विभागात प्रत्येकी तीन पारितोषिकं दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक – ७५००/- द्वितीय पारितोषिक- ५०००/- आणि तृतीय पारितोषिक- ३०००/- आहे.

या स्पर्धेतील विजयी फिल्मव्यतिरिक्त अन्य १० सर्वोत्कृष्ट फिल्म्सची निवड करण्यात येणार आहे. या १० फिल्म्स Virus मराठीच्या YouTube चॅनेल वर प्रदर्शित केल्या जातील. आणि सर्व पुरस्कार विजेत्या फिल्ममेकर्सला लॉकडाउन संपल्यानंतर व्हायरस मराठीसोबत काम करायची संधी मिळणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी –
१. स्पर्धेचे सगळे नियम पाळून व्हिडीओ शूट केलेला असावा.
२.टेक्निकल स्पेसिफिकेशनची चिंता नाही, मोबाईलवर शूट केलेली असली तरी चालेल
३. व्हिडीओची क्वालिटी उत्तम असून एडिटींग नीट केलेलं असावं
४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फिल्म्सच्या विषयाचं आणि वेळेचं बंधन नाहीये. (स्पर्धेक कोणत्याही विषयावर फिल्म करु शकतात.)
दरम्यान, या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना व्हायरल मराठीच्या फेसबुक पेजला भेट द्यावी लागेल. तेथे या स्पर्धेचा फॉर्म उपलब्ध असून १२ मे पर्यंत फिल्मचं सबमिशन करायचं आहे.
फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी
संपर्क- आशुतोष- 9833077857 / दिशा- 9867081530
Email- vmffest@gmail.com