23 January 2020

News Flash

उमेशसोबत बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याविषयी प्रिया म्हणते…

'आणि काय हवं?' या सीरिजमध्ये या दोघांनी स्क्रीन शेअर केली आहे

प्रिया बापट, उमेश कामत

मराठी चित्रपटसृष्टीतलं क्युट कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत. ‘टाईम प्लीज’ या चित्रपटानंतर बऱ्याच काळानंतर ‘आणि काय हवं?’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे या वेबसीरिजमुळे या दोघांच्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं प्रियाने सांगितलं.

‘आणि काय हवं?’ ही मराठी वेबसीरिज असून उमेशची ही पहिली सीरिज आहे, तर प्रियाची दुसरी. या वेबसीरिजमध्ये लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्यांमध्ये घडणारे अमुल्य आणि तितकेच महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले आहेत. मग यामध्ये स्वत: विकत घेतलेले पहिले घर, एकत्र साजरे केलेले सण या सर्वच गोष्टी कायम लक्षात राहणाऱ्या असतात. विशेष म्हणजे या साऱ्या घटनांचा आणि प्रिया, उमेशचा जवळचा संबंध असल्याचं प्रियाने सांगितलं.

“या वेबसीरिजची टीम मला माझ्या कुटुंबासारखी वाटते. तसेच या वेबसीरिजमध्ये लग्न झालेलं जोडपं आहे. जे त्यांच्या लग्नानंतरचे काही सुंदर क्षण पहिल्यांदा अनुभवताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे उमेशसोबत खूप वर्षांनी काम करण्याचा अनुभव चांगलाच होता आणि त्यात लग्नानंतरच्या आमच्यासुद्धा काही आठवणी आहेत, त्या आठवणी या वेबसीरिजमुळे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्या”,असं प्रिया म्हणाली. दरम्यान, या वेबसीरिजचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं असून निर्मिती अनिश जोग यांनी केली आहे.

First Published on July 22, 2019 3:37 pm

Web Title: marathi web series aani kay haav priya bapat and umesh kamat ssj 93
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : आता शिव-वीणा एकमेकांशी बोलणार नाहीत ?
2 अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास
3 …म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालाय #NotMyDeepika हा हॅशटॅग
Just Now!
X