लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा आता मोठ्या पडद्यावर येणार असून पु. ल. देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. सागर देशमुख हा पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणार असून हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी ‘फाळकेज् फॅक्टरी’ या नावाने चित्रपट निर्मितीची नवी कंपनी सुरू केली असून या बॅनरअंतर्गत महेश मांजरेकर यांनी पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा सांगणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

चित्रपटात पुलंची भूमिका कोण साकारणार, चित्रपटाची कथा कोण लिहिणार, चित्रपटाचे संगीतकार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होते. अखेर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. पडद्यावर पुलंची भूमिका साकारण्याचा बहुमान सागर देशमुखला मिळाला आहे.

सागरने हंटर, वायझेड या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. पुलंच्या भूमिकेबाबत सागर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, माझ्यासाठी हा आनंददायक अनुभव आहे. या भूमिकेसाठी माझी निवड होईल असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. महेश मांजरेकर या भूमिकेसाठी अतुल परचुरे, आनंद इंगळे किंवा निखील रत्नपारखी यांच्यापैकी एखाद्याची निवड करतील, असे मला वाटत होते. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मला महेश मांजरेकर यांचा फोन आला. त्यांनी पुलंच्या भूमिकेसाठी मला विचारणा केली आणि ते ऐकून मला सुखद धक्काच बसला, असे आनंदने सांगितले. पुलंनी मिळवलेले यश हे सर्वांनाच माहित आहे. पण या भूमिकेमुळे मला पुलंना एक व्यक्ती म्हणून जाणून घेण्याची संधी मिळाली आणि प्रेक्षकांनाही हाच अनुभव येईल, असे सागरने सांगितले.