प्रेक्षकांना नेमकी काय आवडतं हे झी नेटवर्कला चांगलेच माहित आहे. प्रेक्षकांची आवड निवड जाणून ते सतत नवनवीन प्रयोग करत असतात. आतापर्यंत झी टॅाकीजने प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेत आजवर अनेक दर्जेदार व उत्तमोत्तम कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना दिली आहे. नेहमीच नाविन्याच्या शोधात असलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी झी टॅाकीजने पुन्हा एकदा एक वेगळा प्रयत्न केला आहे.

‘तथास्तु’ या मराठीतल्या पहिल्या सायलेंट थ्रिलर सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे. तथास्तु या सिनेमातून हटके ट्रीट झी टॅाकीज घेऊन येत आहे. ‘तथास्तु’ हा मराठीतला पहिला सायलेंट थ्रिलर ठरणार आहे. एकही संवाद नसलेल्या या सिनेमाची सशक्त कथा-संकल्पना, कलाकारांचे लाजवाब परफॉर्मन्स आणि तंत्रकुशल दिग्दर्शन ही तथास्तुची जमेची बाजू आहे. संदीप पाठक, माधवी निमकर या कलाकारांच्या अदाकारीने एक तासाचा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल यात शंका नाही. या सिनेमाचे प्रसारण शनिवार ३ डिसेंबरला रात्री १०.०० वा. आणि रविवारी ४ डिसेंबरला रात्री १०.०० वा. करण्यात येणार आहे.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

‘तथास्तु’ सिनेमाच्या निमित्ताने मराठीतल्या या वेगळ्या प्रयोगाचे प्रेक्षक निश्चितच स्वागत करतील असा विश्वास झी टॅाकीजने व्यक्त केला आहे. शनिवार ३ डिसेंबर रात्री १०.०० वा. व रविवार ४ डिसेंबर रात्री १०.०० वा. तथास्तु सिनेमाचा थरार झी टॅाकीजवर नक्की अनुभवा.

https://www.instagram.com/p/BNHAIEqhi1X/